मराठी बातम्या

Directions

मराठी बातम्या Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठी बातम्या, MG Road, Pune University.

24/05/2026

बीड हादरलं! राजकीय वरदहस्त असलेल्या नराधमाकडून विवाहितेवर अत्याचार; गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार, खंडणीचीही वसुली!
​📍 शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी अमर किरण बांगर याच्या कृत्याने माणुसकी काळवंडली!
​बीड:
माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर (वाल्मिक कराड समर्थक) यांचा मुलगा अमर किरण बांगर या नराधमाने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
​🔴 धक्कादायक वास्तव: गुंगीचे औषध आणि ब्लॅकमेलिंग!
​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमर बांगर हा पीडित महिलेला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. एवढेच नव्हे तर, त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले.
​💰 पैशांची हाव आणि खंडणी!
​या नराधमाचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याने पीडित महिलेला धमकावून तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला प्रचंड पैसा दिला, मात्र त्याचा छळ थांबला नाही. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत न्याय मागितला आहे.
​⚖️ राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान?
​आरोपी अमर बांगर हा बीड जिल्ह्यातील मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या जवळचा आणि माजी सभापतींचा मुलगा असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, खंडणी आणि गुंगीचे औषध देऊन शोषण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या हायप्रोफाइल आरोपीला कधी बेड्या ठोकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

04/05/2026

📰 मराठी बातम्या - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 Halad Market : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; हिंगोलीत ६ दिवसांपासून हळद बाजार ठप्प

🗺️ भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण

🥹 नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष

🥹 जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर

📲 मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच

📰 भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी

👨‍🎓 राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल

👨‍🎓 राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला

🤑 पीएफचे रखडलेले पैसे एका क्लिकवर; ईपीएफओ लवकरच सुरू करणार ‘ई-प्राप्ती’ पोर्टल

🤑 आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेताना एजंटास रंगेहात पकडले

🌐 ‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत ; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम – मंत्री आशिष शेलार

⛽ कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

😳 धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो

😯 चाकणमधील खालुंब्रेत बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून हत्या; आरोपीला बारा तासांत ठोकल्या बेड्या

🛣️ मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

🥹 नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प

😯 पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

🗳️ प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते; संजय शिरसाट यांचे मोठे विधान

😯 Nagpur Crime: नागपुरात खळबळ ! आई अन् विवाहित मुलीचा गळफास; दोन महिन्यापूर्वी मुलीच्या बाळाचा झाला होता मृत्यू

🍉 कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

📰 कल्याणमध्ये महापालिकेचा धडक अ‍ॅक्शन मोड! २१ तबेलाधारकांवर गुन्हे दाखल

🏊 ७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,39,168/- || 24K = 1,51,820/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी बातम्या
👇👇👇
Follow the मराठी बातम्या channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbDoDE6BVJlCV3mLjA2H
➖➖➖➖➖➖➖

 #नवीनमाहिती  #आरोग्य
03/05/2026

#नवीनमाहिती #आरोग्य

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

03/05/2026

#झाडेवाचवा

03/05/2026

#नवीनमाहिती

📰 मराठी बातम्या - आजच्या चालू घडामोडी➖➖➖➖➖➖➖👨‍🌾 Halad Market : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; हिंगोलीत ६ दिवसांपासून हळद बा...
03/05/2026

📰 मराठी बातम्या - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 Halad Market : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; हिंगोलीत ६ दिवसांपासून हळद बाजार ठप्प

🗺️ भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण

🥹 नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष

🥹 जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर

📲 मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच

📰 भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी

👨‍🎓 राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल

👨‍🎓 राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला

🤑 पीएफचे रखडलेले पैसे एका क्लिकवर; ईपीएफओ लवकरच सुरू करणार ‘ई-प्राप्ती’ पोर्टल

🤑 आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच घेताना एजंटास रंगेहात पकडले

🌐 ‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत ; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम – मंत्री आशिष शेलार

⛽ कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

😳 धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो

😯 चाकणमधील खालुंब्रेत बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून हत्या; आरोपीला बारा तासांत ठोकल्या बेड्या

🛣️ मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

🥹 नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प

😯 पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

🗳️ प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते; संजय शिरसाट यांचे मोठे विधान

😯 Nagpur Crime: नागपुरात खळबळ ! आई अन् विवाहित मुलीचा गळफास; दोन महिन्यापूर्वी मुलीच्या बाळाचा झाला होता मृत्यू

🍉 कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

📰 कल्याणमध्ये महापालिकेचा धडक अ‍ॅक्शन मोड! २१ तबेलाधारकांवर गुन्हे दाखल

🏊 ७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,39,168/- || 24K = 1,51,820/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी बातम्या
👇👇👇
https://www.facebook.com/share/1Avr6EMBEc/

Journalist

30/04/2026

tree

Address

MG Road
Pune University
.411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी बातम्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share