20/08/2026
हा फोटो पाहिलात. एक महत्त्वाचा फोटो आहे हा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेकदा चमत्कार घडत असतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होत असतात. अशाच एका चमत्काराचा हा फोटो आहे.
साधारणपणे 20 –22 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी नुकतीच आयुर्वेदीय प्रॅक्टिसला सुरुवात केली होती. गावामध्ये माझ्या घराशेजारी मेंढपाळ लोकांची वस्ती आहे. फोटोमधील हा व्यक्ती, या वस्तीमध्येच राहतो. एकदा शेळ्यांना चरायला घेऊन गेला असता, पाला काढण्यासाठी हा झाडावर चढला. झाडाच्या शेजारून एम.एस.ई.बी. ची वायर गेली होती. फांद्या तोडत असताना त्याचा स्पर्श या उघड्या वायरला झाला. जोराचा शॉक बसून तो झाडावरून खाली कोसळला. आणि नेमका मानेवर पडला. मानेचा मणका फ्रॅक्चर झाल्याने, त्याचं शरीर मानेपासून खाली लुळं पडलं. दोन्ही हातांची, पायांची सर्वच हालचाल बंद पडली.मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला लगेच कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अनेक दिवसांच्या उपचारानंतर ही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. डॉक्टरांनी हतबलता व्यक्त करून त्याला डिस्चार्ज दिला. वयाच्या तिशीमध्येच तो अंथरुणाला खिळला. हातापायांची कोणतीच हालचाल नाही. सर्व विधी आता अंथरुणातच व्हायचे. घरची अतिशय गरीब परिस्थिती. बायको, दोन लहान मुलं. त्यांचं पोट कसं भराव, याची आता विवंचना लागून राहिली. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देताना त्याला लघवीची पाईप लावलेली होती. ती दर पंधरा-वीस दिवसांनी बदलायला लागते. माझे घर जवळच असल्याने , ती पाईप बदलण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरची निराशा, घरची दरिद्री परिस्थिती पाहून फार वाईट वाटलं. या रुग्णासाठी आपल्याला काही करता येईल का, याचा विचार सुरू झाला.
पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत असताना, वैद्य जमदग्नी सर यांच्याकडे मी आयुर्वेद शिकायला जायचो. त्यावेळी सरांनी पॅरॅलिसिसच्या रुग्णांसाठी डोक्यावर करायला एक लेप सांगितला होता. रुग्णाची आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती. त्यामुळे महागडे उपचार करून फायदा नव्हता. म्हणून मी हा लेप आणि नाकात टाकण्यासाठी नस्य औषध त्याला द्यायचं ठरवलं. डोक्यावर आणि मानेवर लेप कसा करायचा हे नीट त्यांना समजावून सांगितलं आणि नाकात टाकण्यासाठी नस्याचे थेंब दिले. पंधरा दिवसानंतर लघवीची पाईप बदलण्यासाठी जेव्हा मी त्याच्या घरी पुन्हा गेलो, त्यावेळेला त्याच्या हाताच्या बोटांमध्ये थोडी थोडी हालचाल होत असल्याचं जाणवलं. हे पाहून मला आणि रुग्णालाही हुरूप आला. पुन्हा तोच लेप आणि नस्य चालूच ठेवले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस रुग्णांमध्ये प्रगती होऊ लागली. हाताच्या बोटांबरोबरच पायाची बोटही तो हलवू लागला. काही दिवसानंतर हाता पायांच्या हालचाली चालू झाल्या आणि एक दिवस तर रुग्णाला उठवून उभं केलं असता, काही वेळासाठी तो उभा ही राहिला. लेप आणि नस्यच्या उपचाराने त्याची तब्येत इतकी सुधारली की त्याने हळूहळू चालायला पण सुरुवात केली. त्याच्या एका हातामध्ये किरकोळ दोष बाकी राहिला. पण इतर अवयव मात्र पूर्णपणे कार्यक्षम झाले. हळूहळू त्याने शेळ्या पाळायला पुन्हा सुरुवात केली. जवळजवळ वीस वर्षे त्याने हा व्यवसाय न थांबता केला.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये मज्जासंस्थेच्या पेशींना इजा झाल्यास त्या दुरुस्त करता येत नाहीत असं मानलं जातं. पण या रुग्णाच्या बाबतीत मात्र अशक्य गोष्ट शक्य झाली.मज्जा रज्जू ला मोठी इजा होऊन सुद्धा हा रुग्ण बरा झाला.आणि हे एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. वैद्यकीय व्यवसायाच्या सुरुवातीलाच या रुग्णाने एक चांगली शिकवण मला दिली. कोणत्याही रुग्णावर उपचार करताना नकारात्मक विचार कधीही ठेवायचे नाहीत. प्रयत्न करीत राहायचे. या गोष्टीचा फायदा मला नंतर अनेकदा झाला. अनेक असाध्या समजले गेलेले रुग्ण बरे करता आले. काहींचे आयुष्यमान वाढले तर काहींना अधिक दर्जेदार आयुष्य देता आले. अशाच आणखी काही रुग्णांच्या कथा, आपण जाणून घेऊयात पुढच्या लेखामध्ये.
डॉ. इम्रान नायकवडी.
आयुष आयुर्वेद पंचकर्म आणि ॲक्युपंक्चर.
1383, रिलायन्स मॉल शेजारी, लक्ष्मीपुरी कोल्हापूर.
मो. 9822434312.