31/08/2026
जीसीआय सिटी वाशिम व सेवार्थ ग्लोबल हेल्थकेअर सर्व्हिसेसतर्फे भव्य आरोग्य रक्त तपासणी शिबिर
वाशिम : जीसीआय सिटी वाशिम आणि सेवार्थ ग्लोबल हेल्थकेअर सर्व्हिसेस, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने काल दीर्घायू आयुर्वेद, वाशिम येथे भव्य आरोग्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी विविध रक्त तपासण्यांचा लाभ घेतला.
नागरिकांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी तसेच विविध आजारांचे वेळीच निदान होऊन त्यावर योग्य उपचार करता यावेत, या उद्देशाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये नागरिकांची विविध आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान सेवार्थ ग्लोबल हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या तज्ज्ञ टीमने नागरिकांना आरोग्य तपासणीचे महत्त्व, नियमित रक्त तपासणीची आवश्यकता तसेच आजारांचे लवकर निदान याबाबत मार्गदर्शन केले.
जीसीआय सिटी वाशिम आणि सेवार्थ ग्लोबल हेल्थकेअर सर्व्हिसेस यांच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. भविष्यातही अशाच प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीसीआय सिटी वाशिमचे पदाधिकारी, सदस्य तसेच सेवार्थ ग्लोबल हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.